कोल्हापूर : इचलकरंजी येथे दुचाकीस्वार आणि विद्युत खांबाला धडक देऊन भरधाव वेगाने जाणार्‍या स्विफ्ट कार चालवणाऱ्या युवकावर मंगळवारी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिद्धांत श्रीकांत कचरे (वय २१ राहणार कबनूर ) असे कारवाई झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत महावितरण कंपनीला माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर संबंधित युवकावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक राजू ताहसीलदार यांनी मंगळवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी दुपारच्या सुमारास स्टेशन रोडवरुन एक स्विफ्ट कार अत्यंत वेगाने निघाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात या कारने रस्त्यावर जाणार्‍या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर न थांबता कारचालक सुसाट निघाल्याने खळबळ माजली.

आणखी वाचा-जनतेसाठी जीवन समर्पित करणारा नेता गमावला; राहुल गांधी यांनी पी. एन. पाटील यांच्या विषयी व्यक्त केल्या शोकभावना

त्याचवेळी त्याच रस्त्यावरुन निघालेल्या पोलिस गाडीने अपघात पाहून त्या कारचा पाठलाग सुरु केला. पोलिस गाडी पाहताच कार चालकाने आणखीन वेग वाढविला. त्यानंतर कारचालकाने अचानकपणे जवाहनगरकडे कार वळवली. आणि काही अंतर गेल्यानंतर पुन्हा स्टेशन रोडवर आला. सुमारे तीन किलोमीटरपर्यंत हा पाठलाग सुरु होता. अखेर कार चालकाचा ताबा सुटल्याने कारची पंचगंगा कारखाना परिसरात एका विद्युत खांबला धडकुन थांबली. आणि पोलिसांनी तात्काळ त्या कारचालकाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी चारचाकीसह चालकाला थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. धडक दिलेल्या दुचाकीचे नुकसान झाले असून संबंधित कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सिद्धांत याच्यावर भारतीय दंड विधान ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा अधिक तपास सहाय्यक फौजदार एम.पी. कराड आहेत.