केंद्रीय पुरातत्व विभागाने करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या मूर्तीशी छेडछाड केली असल्याचा आरोप श्रीपूजकांनी बुधवारी केला. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची झीज झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर गेल्या महिन्यात राज्य पुरातत्व विभागाच्या वतीने तर काल केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, काल केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करताना मूर्तीची छेडछाड झाल्याचा आरोप श्री पूजकांच्या वकिलांनी केला आहे. चेहऱ्यावरील लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे श्रीपूजकांच्या वकिलांनी म्हटले आहे. 

न्यायालयामध्ये गजानन मुनीश्वर यांनी याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये आज श्रीपूजक माधव वासुदेव मुनीश्वर यांनी सत्य प्रतिज्ञावर निवेदन सादर केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, काल चार अधिकारी मूर्तीची पाहणी करण्याकरिता आले होते. अधिकाऱ्यांनी महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची पाहणी केली तेव्हा त्यातील एका अधिकाऱ्याने महालक्ष्मी देवीच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर १८ सप्टेंबर २०२२ रोजी अगर त्यापूर्वी केलेल्या संवर्धनाचा लेप काढला. तसेच नाकावरचा सुद्धा लेप काढला. अधिकारी गाभाऱ्यात सुमारे २५ मिनिटे होते. माधव मुनीश्वर हे अंबाबाई महालक्ष्मी हक्कदार श्री पूजन मंडळाचे सचिवही आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central archeology department allegation of tampering with goddess mahalakshmi idol zws