लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : विनोद तावडे हे कर्तुत्वान व्यक्तिमत्व आहे. त्यांना कोणते जबाबदारी द्यायची हे केंद्र शासन ठरवेल. जेथे जातील तेथे ते यश मिळवण्यासाठी बारकावे शोधत असतात. ते आणखी मोठे होतील त्याचा आम्हाला आनंद आहे. भाजपचे जे ठरते; ती गोष्ट शेजारच्या मुंगीलाही कळत नाही , असे सूचक विधान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे केले.

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून पक्ष संघटनेचे काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यावर मंत्री पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, भाजपमध्ये नेत्यांच्या इच्छेपेक्षा पक्षादेश महत्त्वाचा असतो. नेत्यांनी फक्त इच्छा व्यक्त करायचे असते, आज्ञा करायचे नसते. अमित शहा यांनी फडणवीस यांना थांबण्यास सांगितले आहे. ते पुन्हा कामाला लागले आहेत.

आणखी वाचा-चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात ६५ हजार वृक्ष लागवड, संगोपनाचा शुभारंभ

तिघांनी एकत्र बसावे

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतील पराभव बाबत तसेच कागलमधून व्यक्त होणाऱ्या मतांतराबाबत हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, समरजित घाटगे यांनी एकत्र बसून चर्चा करावी. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मध्ये आम्ही कमी पडलो असल्याने आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जातील, असेही पाटील म्हणाले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government will decide what responsibility to give to vinod tawde says chandrakant patil mrj
Show comments