बालेकिल्ल्यांना हादरे ; भाजपच्या लाटेमुळे अस्तित्व टिकविताना कसोटी

नगरपालिका आणि पाठोपाठ जिल्हा परिषद या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीची राजकीय जहागिरी मानली जात असताना नेमक्या याच राजकीय पट्टय़ात भाजपचा पाया विस्तारत चालला आहे. अशा स्थितीत बालेकिल्ल्याला पडलेली भगदाडे बुजवून आपले अस्तित्व टिकवणे, हे दोन्ही काँग्रेससमोरचे मोठे आव्हान आहे.

BJP worried about defection before Legislative Assembly seat allocation in Maharashtra
महाराष्ट्रात जागावाटपापूर्वी भाजपला पक्षांतराची चिंता? २३ जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाविरुद्ध भाजपमध्ये नाराजी का?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Sharad Pawar
Sharad Pawar: ‘त्या लोकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयारच आहोत’, राष्ट्रवादीत प्रवेश घेणाऱ्यांबाबत शरद पवारांचे सूचक विधान
President Draupadi Murmu on Maharashtra tour
राष्ट्रपती मुर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar X
Mahyuti Disruption : तानाजी सावंतांपाठोपाठ भाजपा नेत्याची राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, “त्यांच्यामुळे आमचं वाटोळं…”, महायुतीत धुसफूस चालूच
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
Prithviraj Chavan : “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली, कारण..”, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
NCP, jayant patil, sawantwadi
शिव पुतळा कोसळला, महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला, महाराष्ट्र सरकारला तोंड दाखवायला जागा राहिली नाही – जयंत पाटील
Rajendra Shingne on Ajit Pawar
Rajendra Shingne : आमदार राजेंद्र शिंगणेंचं मोठं विधान; म्हणाले, “अजित पवारांबरोबर नाईलाजाने…”

भाजपच्या वाढत्या विस्तारामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली असताना पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते हे कार्यकर्त्यांना सावरण्याबरोबरच पक्षाचे अस्तित्व ठळक करण्यात कितपत यशस्वी ठरतात, यावरच त्यांचे आगामी राजकारण व अस्तित्वही अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी पक्षबांधणी भक्कम करण्याचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

पश्चिम महाराष्ट्रात आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व राहिले. २० वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे शासन असताना काँग्रेसमधील कुंपणावर असणारे काही नेते सत्तेच्या मागे लागून युतीमध्ये प्रवेशकत्रे झाले होते. पण युतीच्या सत्तेचा सूर्य मावळला आणि राज्यात पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आल्यावर या मंडळींची घरवापसी झाली. मात्र गेल्या अडीच-तीन वर्षांतील चित्र मात्र वेगळेच आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा दोन्ही काँग्रेसमधील स्थानिक नेते मोठय़ा संख्येने हाती कमळ घेताना दिसत आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्हा परिषदांमध्ये कमळ फुलल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाया ठिसूळ झाला आहे.

अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये याची प्रचीती आली. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांनी जणू रांगाच लावल्या होत्या. भाजपनेही कसलेही भान न ठेवता येईल त्याच्या गळ्यात भाजपचे उपरणे घालत प्रवेश दिला. यामुळेच नगरपालिका व जिल्हा परिषदांमध्ये भाजपचे कमळ फुलू शकले. केवळ मूळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुका लढविल्या असत्या तर भाजपची इतकी ताकद वाढली नसती. पण दोन्ही काँग्रेसमधून आयात झालेल्या नेत्यांना सोबत घेतल्यामुळेच भाजपची ताकद वाढली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात ‘बाटली तीच मात्र लेबल नवे’ अशी भाजपची स्थिती झाली आहे. नाव भाजपचे असले तरी निवडून आलेले वा सत्तास्थानी पोहोचलेले हे मूळचे काँग्रेसवासीच आहेत. उभय काँग्रेसच्या दृष्टीने सध्या हाच चिंतेचा विषय बनला आहे.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपच्या वळचणीला गेले की सत्तापदे मिळतील. ती नाही मिळाली तरी आपल्या सहकारी संस्थांतील गरव्यवहारांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार नाही, असा सुरक्षित विचार करत काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशांना रोखणे हे जिल्ह्य़ातील काँग्रेस नेतृत्वासमोर आव्हान आहे. पण जिल्ह्य़ा-जिल्ह्य़ातील उभय काँग्रेसचे नेते गटबाजी व अहंकारी राजकारणात इतके गुरफटले गेले आहेत की त्यांना आपल्या मतदारसंघाच्या पल्याड जाऊन काही राजकारण करावे, पक्षाची संघटनबांधणी करावी याचा विचारही येत नसल्याचे दिसते. नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन केले, पण तेसुद्धा केवळ छायाचित्र प्रसिद्ध करण्यासाठी. अशा परिस्थितीत जनतेशी तुटलेली नाळ पुन्हा जुळणे कठीणच.

उभय काँग्रेसचे नेतृत्वही भाजप-शिवसेनेच्या आक्रमक राजकारणासमोर मरगळलेल्या अवस्थेत आहे. जिथे नेतृत्वातच जान नाही तेथे हवालदिल कार्यकर्त्यांची अवस्था काय वर्णावी? दोन्ही काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील ढासळत चाललेली अवस्था पाहता या पक्षांना ‘अच्छे दिन’ कधी येणार, असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आहे. दोन्ही काँग्रेसना आपापल्या पक्षांना चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. स्थानिक नेत्यांनी वैयक्तिक मतभेदांना तिलांजली देऊन एका मंचावर येत भाजपविरोधात दोन हात करण्याची तयारी दर्शवावी लागेल. पण ‘अडवा आणि जिरवा’चे राजकारण करणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या नेतृत्वात भिनलेली गटबाजी व नागरिक – कार्यकर्त्यांशी फटकून राहण्याची सरंजामी वृत्ती दूर होत नाही तोवर त्यांना चांगले दिवस येणे कठीणच आहे.

भाजपची पोलखोल करू : पृथ्वीराज चव्हाण</strong>

जनतेचा विश्वास संपादन करण्याचे संयुक्त प्रयत्न दोन्ही काँगेसने एकत्रित केले पाहिजेत. खेरीज, एकत्रित येऊन दोघांनी पक्ष कार्य प्रामाणिकपणे करण्यावाचून पर्यायही नाही, अन्यथा आधीच खड्डय़ात गेलो आहे, त्यापेक्षा अधिकच नुकसान सहन करावे लागेल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. सत्ता, संपत्तीच्या जोडीला धमक्या देऊन भाजप सत्ता वाढवत आहे. सहकारात काम करणाऱ्यांना तुरुंगात धाडले जात आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे. भाजप सरकारच्या या बेगडी चेहऱ्याचा पर्दापाश करण्यासाठी दोन्ही काँग्रेसचे आमदार बुधवारपासून चंद्रपुरातून महाराष्ट्रभर एकत्रित दौऱ्याला सुरुवात करत आहोत. दुसऱ्या टप्प्यात आम्ही पश्चिम महाराष्ट्र िपजून काढणार आहोत, असे नमूद करत दोन्ही काँगेस पुन्हा सक्रिय होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]