कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी सोमवारी भाजपला पाठिंबा दिला आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी पाठिंब्याचे पत्र सादर केले.चंदगड मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात भाजपचे असलेले शिवाजी पाटील यांची दुसऱ्यांदा निवडणूक झाली. गेल्यावेळी दुसऱ्या स्थानी राहिलेले अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी राजेश पाटील यांच्या पराभवाची परतफेड तब्बल २४ हजाराच्या मताधिक्याने केली होती. काल जिल्ह्यातील महायुतीचे आमदार विशेष विमानाने मुंबईला गेले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर आमदार पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा असल्याचे पत्र सादर केले. फडणवीस यांनी विजयाबद्दल आमदार पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवाजी पाटील यांनी मुंबईत आयोजित केलेल्या दहीहंडी समारंभात फडणवीस यांनी त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandgad assembly constituency assembly election 2024 mla shivaji patil supports bjp amy