सुवर्णकार कामगार कल्याण मंडळाची स्थापन करणे, नोकरीत आरक्षण आणि नरहरी महाराजांचे पंढरपूर येथील स्मारकाचे काम या तीन मागण्यांवर र्सवकष माहितीपूर्ण अहवाल द्यावा. त्यावर समाजकल्याण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बठकीचे आयोजन करून त्याची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले. सुवर्णकार समाजाने मागण्यांसाठी आंदोलन करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले .
अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष कृती समितीच्या वतीने पहिले अधिवेशन कोल्हापुरात झाले. त्यावेळी पाटील यांनी वरील आश्वासन दिले. समाजाच्या १३ मागण्यांकरिता आंदोलन करण्याचा इशारा संयोजाकांनी प्रास्ताविकात दिला होता. त्यामुळे अन्य वक्त्यांनी यावर मत व्यक्त केले. आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुरेश हाळवणकर यांनी समाजाला अल्पसंख्याक दर्जा व त्या अनुषंगाने मिळणाऱ्या सवलती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.
श्रीक्षेत्र रामिलगचा विकास करण्यासाठी सहा कोटी रुपये मंजूर असून एक कोटी रुपयांचे काम सध्या सुरू असल्याचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी सांगितले.
जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनीही मार्गदर्शन केले. स्वागत अजित पोतदार यांनी केले. प्रसाद धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. सदानंद गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. महाराष्ट्राबरोबर गोवा आणि कर्नाटक येथील समाजाचे लोक उपस्थित होते.
प्रकाश हुक्कीरे यांचे ३७ लाख
चिक्कोडी येथे समाजाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या समाज मंदिरासाठी ३७ लाख रुपये मदत तेथील खासदार प्रकाश हुक्कीरे यांनी दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष कृती समितीच्या वतीने नाम फाउंडेशनला मदत करण्यात येणार असून ती गोळा करण्याचा प्रारंभ करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा