कोल्हापूर: शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १४ जुलै रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

महिनाभरातच त्यांचा हा दुसरा कोल्हापूर दौरा आहे. गेल्या महिन्यात १३ जून रोजी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत येथे त्यांची सभा झाली होती. लगेचच शुक्रवारी पेटाळा मैदान येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. मंत्री, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी दिली.

Story img Loader