मित्रांसोबत नेर्ली तामगांव (ता. करवीर) येथे पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा रविवारी बुडून मृत्यू झाला. विनोद आप्पासाहेब यादव (वय १६, सध्या रा. कणेरीवाडी मूळ रा. सांगवडेवाडी, ता. करवीर) असे त्याचे नांव आहे.
विनोदने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. सकाळी विनोद आपल्या मित्रांसमवेत कणेरी येथील तलावात पोहण्यासाठी निघाला होता. मात्र या तलावात पाणी नसल्याने मित्रांनी नेर्ली तामगांव येथे जाण्याचा सल्ला दिला. यानुसार सर्व मित्र तलावाकडे पोहण्यासाठी गेले होते. दिनेशला पोहता येत नसल्याने तो खोल पाण्यात गेला नाही. मात्र पाण्यात तोल गेल्याने तो बुडाला.

Story img Loader