शहरात शुक्रवारी ख्रिस्त बांधवांनी नाताळ सण जल्लोषी वातावरणात साजरा केला. शहरातील चर्चमध्ये प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते. ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत परस्परांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या.
शहरात ख्रिस्त बांधवांची संख्या उल्लेखनीय आहे. येथे चर्चचे प्रमाणही बरेचसे आहे. यातील वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राइस्ट चर्च, सेंट फ्रान्सिस चर्च, ऑल सेंट चर्च, झेवियर्स चर्च आदी चर्चामध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला उपासना करण्यात आली. रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करीत नाताळचे स्वागत केले.
ख्रिस्त बांधवांच्या आदराचे प्रतीक असलेल्या नाताळ सणाचे वातावरण शहरामध्ये दिसत आहे. येशूंचा जन्मदिवस साजरा करण्याचा उत्साह ख्रिस्त बांधवांमध्ये आहे. त्यासाठी बाजारपेठांमध्येही ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, होली रिट, प्रभू येशू व मेरी यांच्या मूर्ती, चांदणी, खेळणी याचे सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ फुलली असून त्याची खरेदीही उत्साहाने करण्यात आली. नाताळनिमित्त मिठाई आणि विद्युत रोषणाईसाठी लागणाऱ्या विविध वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. ख्रिश्चन बांधवांप्रमाणे अन्यधर्मीयांनीही केक, पुिडग, मिठाई याची खरेदी केली.
शुक्रवारी दिवसभरात ख्रिस्त जन्मानिमित्त उपासना करण्यात आली. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत दिवसभर आळीपाळीने उपासना होत राहिली. त्यामध्ये ख्रिस्त बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा