लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने आज देशभरात २७ राज्ये, ९०० शहरे व १६०० ठिकाणी प्रकल्प अमृत अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन ‘ या उपक्रमा अंतर्गत रविवारी जलस्वच्छता अभियान राबवण्यात आले. संत निरंकारी सत्संग मंडळ इचलकरंजी शाखेने येथील पंचगंगा नदीच्या घाटावर व तसेच गणपती मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम राबवली.
आणखी वाचा-कोल्हापूर : चंदगड तालुक्यात टस्कर हत्तीचा उपद्रव वाढला
सद्गुरू माता सुदिक्षा यांच्या सुचनेनुसार देशभरात २७ राज्ये, ९०० शहरे व १६०० ठिकाणी प्रकल्प अमृत अंतर्गत हे सेवाकार्य करण्यात आले. यावेळी निरंकारी सत्संग सेवा मंडळाचे दत्तात्रेय गोरे, विलास लाड,पांडुरंग भोई, मुखी, सेवा दल अधिकारी, महिला, पुरुष,युवक- युवती सहभागी झाले होते. स्वच्छता अभियानाचा प्रारंभ इचलकरंजी नागरिक मंचचे अध्यक्ष अभिजीत राजेंद्र पटवा, उपाध्यक्ष, उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक अप्पासाहेब पाटील यांनी केले.