कोल्हापूर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मागील वर्षी वेळेत अर्थसहाय्य झाल्यामुळे प्राण वाचलेल्या ‘दुवा’ या चिमुकलीचा पहिला वाढदिवस जागतिक महिला दिनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा वैद्यकीय समन्वयक प्रशांत साळुंखे, साई स्पर्श हॉस्पिटलचे डॉक्टर विजय गावडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – महाविकास आघाडीत मतभेद मिटण्यावर ‘वंचित’च्या समावेशाचा निर्णय अवलंबून – प्रकाश आंबेडकर

हेही वाचा – यंत्रमागाच्या वीज दर सवलतीची अंमलबजावणी सुरु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून वेळेत अर्थसहाय्य मिळाल्यामुळे प्राण वाचलेल्या चिमुकलीच्या आईने कोल्हापूरमध्ये १३ जून २०२३ मध्ये कोल्हापुरात झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून आभाराचे पत्र दिले होते. तसेच त्यांचे ऋण व्यक्त करण्याच्या भावनेने त्यांनी मुलीचे नाव ‘दुवा’ असे ठेवल्याचे तिची आई फरिन मकुबाई यांनी सांगितले होते. आज याच दुवाचा पहिला वाढदिवस मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाल्यामुळे खूप आनंद झाल्याची भावना तिची आई फरिन मकुबाई यांनी व्यक्त केली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde celebrated birthday of duva whose life was saved by the cm medical aid fund ssb
Show comments