कोल्हापूर : कोल्हापूतील राजाराम तलावाच्या काठी ऐतिहासीक शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय परिषद केंद्राची (कन्व्हेंशन सेंटर) उभारणी वर्षभरात करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिले.बैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी उपस्थित होते.
केंद्रातील सुविधा
या केंद्रात २००० क्षमतेचे सभागृह, कलादालन, ॲम्फीथिएटर, तलावामध्ये संगीत कारंजे, लाईट ॲण्ड साऊंड शो आदी सुविधा तसेच पंचतारांकीत हॉटेलसाठी जागा असणार आहे.
१०० कोटीचा निधी यानिमित्त्ने सामाजिक, वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण याकरिता कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आदी उपक्रम होतील. प्रकल्पासाठी १०० कोटीचा खर्च येणार असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.