कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशाची सामूहिक जबाबदारी घेतली पाहिजे. कोणा एकावर ठपका ठेवता कामा नये, असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात महायुतीचे संजय मंडलिक यांचा पराभव झाला भाजपच्या आढावा बैठकीत कागल मधील घटक पक्ष कारणीभूत असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला. यावरून हसन मुश्रीफ त्यांच्याकडे बोट गेले आहेत. मात्र याचा मुश्रीफ यांनी इन्कार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामतीला काय झालं?

तर आज त्यांनी पत्रकारांशी बोलताना लोकसभा निवडणुकीतील पराभव पुन्हा एका मुळे झालेला नाही . त्याची सामूहिक जबाबदारी घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले. जर राज्यात सगळीकडे तसं झालं असतं तर बारामतीला काय झालं? बारामतीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते होते. लोकसभेला कुणी काम केलं आणि कुणी केलं नाही अशा बातम्या आल्या तर महायुतीत विनाकारण बेबनाव होईल. लोकसभा निवडणुकीतील जो निकाल लागला ते सर्वांचे अपयश आहे. मतदान कसे झाले आहे या संदर्भात माहिती घेण्यात आली आहे. यामुळे टीका न करता येणाऱ्या विधानसभेला महायुती म्हणून एकसंघपणे कसे सामोरे गेले पाहिजे, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा…इचलकरंजीत विवाहितेचा पतीकडून खून

फडणवीस मंत्रिमंडळात हवेतच

लोकसभा निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सरकार बदलून मुक्त करावं आणि पक्षासाठी वेळ देता यावा अशी इच्छा केंद्रीय नेतृत्वाकडे व्यक्त केली होती. यासंदर्भात आज दिल्लीमध्ये खलबते होत आहे. याबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, हा भाजप अंतर्गत प्रश्न आहे. याबाबत भाजप निर्णय घेईलच. तथापि देवेंद्र फडणवीस राजीनामा देतील असे मला वाटत नाही. देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे एक खंबीर नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाय मंत्रिमंडळात भारतीय जनता पक्ष असणे केवळ अशक्य आहे.

हेही वाचा…शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; समरजितसिंह घाटगे यांचा इशारा

शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे

दरम्यान आज कोल्हापूरमध्ये प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग विरोधात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा महामार्ग रद्द होण्या बाबत आग्रही मागणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर भूमिका मांडताना ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा अशी भूमिका मी यापूर्वीच मांडलेली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारा हा प्रकल्प असल्याने तो रद्द केला जावा यासाठी शक्तीपीठ महामार्ग असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन होत आहेत. तशी शासनाकडे मागणी होत आहे. शासनाला याबाबत निर्णय घ्यावा लागेल.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collective responsibility needed for mahayuti s lok sabha election defeat says minister hasan mushrif psg
Show comments