पुत्र वियोगाने कष्टी झालेल्या शेतकरी पालकास जिल्हाधिकाऱ्यांनी अवमानित करून फटकारले. अपघातातील मदतीचा धनाकर्ष मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी गेलेल्या या बापास ‘तुम्हारे हर सवाल का जवाब देने के लिए मं क्या जज हू क्या. इन्हे बाहर कर दो’ असे खडे बोल जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी सुनावले. हा धक्का बसल्याने मृत नितीशचे वडील तुकाराम पाटील यांना माध्यमकर्मीशी बोलताना तोंडातून शब्दही फुटत नव्हता. याबाबतची कैफियत त्यांनी प्रसार माध्यमापुढे मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोरेवाडी (ता.चंदगड) येथील नितीश तुकाराम पाटील यांच्या वारसांना मस्कत प्रशासनाकडून पाठविलेला नुकसानभरपाईचा २३ लाख ३९ हजारांचा धनाकर्ष जिल्हा प्रशासनच्या चुकीने गहाळ झाला होता. या प्रकरणाची जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी गांभीर्याने दखल घेत या प्रकरणी लिपीक सुप्रिया िशदे यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी अव्वल कारकून व तहसीलदारांवरही कारवाई केली जाणार आहे.
गहाळ धनाकर्षांचा पाठपुरावा करण्यासाठी तुकाराम पाटील हे नातेवाइकांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीस आले होते. तीन तासांहून अधिक काळ पाटील कुटुंबीयांना थांबवून जिल्हाधिकाऱ्यांनी अवघी काही मिनिटे पाटील कुटुंबीयांची भेट घेतली. आपली कैफीयत मांडत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त शब्दांत फटकारले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अपमानास्पद वागणुकीमुळे अपमानित झालेल्या पाटील कुटुंबीयांनी आपली व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडली.
नितीश पाटीलच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईचा धनाकर्ष मिळविण्यासाठी जमीन विकावी लागली. अखेर, धनाकर्ष मिळाला पण तो प्रशासनाकडून गहाळ झाला. त्यावर प्रसार माध्यमांनी तोफ डागल्यानंतर वरिष्ठांकडून जिल्हा प्रशासनाची कान उघाडणी झाली. त्यामुळे सावध होत अपर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी मस्कत राजदूताशी संपर्क साधून धनाकर्ष पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. लवकरच हा धनाकर्ष पाटील कुटुंबीयांना दिला जाणार आहे.