श्री महालक्ष्मी देवीची मूर्तीच्या संदर्भात शासनाला सविस्तर अहवाल पाठवणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी सांगितले.

पुरातत्व खात्याच्या निरीक्षणानुसार महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत असल्याने मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार तात्काळ चालू करावेत. मूर्ती सुस्थितीत नसेल, तर मूर्ती पालटण्याच्या संदर्भात धर्माचार्य, करवीरपीठ-शृंगेरी पीठ आदींचे मार्गदर्शन घेवून अपेक्षित कृती तात्काळ चालू कराव्यात, अशा मागण्यांचे निवेदन देवीभक्त सकल हिंदू समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी रेखावार यांना देण्यात आले.

यावेळी, ‘मूर्तीच्या संदर्भात अहवाल शासनाकडे पाठवणार आहे, त्यावर शासन निर्णय घेईल’, असे जिल्हाधिकार्‍यांनी शिष्टमंडळास सांगितले. दशनाम गोस्वामी आखाड्याचे धर्मगुरु डॉ. कृष्णदेव गिरी, सचिव डॉ. सुशील अग्रवाल, डॉ. सुरेश राठोड, शरद माळी, राजू यादव, रामभाऊ मेथे, शिवानंद स्वामी उपस्थित होते.

Story img Loader