कोल्हापूर : आमदार अमोल मिटकरी यांच्याविरोधात हिंदु धर्माच्या धार्मिक विधींची टिंगल केल्याप्रकरणी येथील गांधीनगर पोलीस ठाण्यात विक्रम चौगुले, अजित पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनांनी केली असल्याचे सुनील घनवट यांनी शुक्रवारी सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
राष्ट्रवादी आमदार मिटकरी यांनी जाहीर कार्यक्रमात हिंदु धर्मातील कन्यादान विधी, त्यांतील मंत्र आणि पुरोहितवर्ग यांचा अपमान केला. ‘या विधींच्या माध्यमातून बहुजन समाजाला फसवले जात आहे,’ असे वक्तव्यही केले. त्यांनी या भाषणातून एका समाज घटकाच्या विरोधात जातीय तेढ निर्माण होईल, अशी भाषा वापरली आहे. कन्यादान विधीच्या मंत्राची टिंगल मिटकरींनी केली, तशी टिंगल अजानबाबत करण्याची हिंमत आहे का ? असा सवाल समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने घनवट यांनी केला आहे.
First published on: 23-04-2022 at 00:02 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint against mitkari kolhapur police station complaint filed ysh