कोल्हापूर : प्रदीर्घकाळापासून प्रलंबित २७ अश्‍वशक्तीवरील यंत्रमागांना प्रति युनिट ७५ पैशांची अतिरिक्त आणि २७ अश्‍वशक्तीखालील यंत्रमागांना प्रती युनिट १ रुपयांची वीज सवलत देण्याला सोमवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचे यंत्रमागधारकांकडून स्वागत केले जात असताना नेत्यांमध्ये श्रेयवाद रंगला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साध्या यंत्रमागाला प्रती युनिट १ रुपयाची सवलत आणि २७ अश्‍वशक्तीवरील यंत्रमागाला ७५  पैशांची अतिरिक्त सवलत देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला होता. नविन वस्त्रोद्योग धोरण जाहिर झाले पण त्यामध्ये याचा समावेश नव्हता.मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली  प्रकाश आवाडे, सुभाष देशमुख, रईस शेख, अनिल बाबर, प्रविण दरके या आमदारांच्या भ्यास समितीने याबाबतची शिफारस केली होती. तर महिला दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही सवलतींची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले होते. त्याचे फलित म्हणून सोमवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत वीज दरात सवलत देण्याच्या निर्णय घेण्यात आला असून यंत्रमाग व्यवसायाला पुन्हा उभारी मिळण्याच्या अपेक्षेने या निर्णयाचे यंत्रमागाधारकांतून स्वागत केले जात आहे.

हेही वाचा >>>शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

श्रेयवाद रंगला

या निर्णयाची माहिती समजताच त्याचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे धावले. नेत्यांच्या समर्थकांनी समाज माध्यमातून आपल्या नेत्याच्या प्रयत्नांमुळे हा निर्णय घेतला गेल्याचा संदेश पेरण्यास सुरुवात केली. कोरोची येथील कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार प्रकाश आवाडे वीज सवलत निर्णय घेण्याबाबत विनंती केल्याने हा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. याच कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने यांनी भाषणात हा मुद्दा उचलून धरल्याची हि फलश्रुती असल्याचा दावा केला जात आहे.