कोल्हापूर: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खोट्या मानहानी खटल्यात अडकविल्याबद्दल येथे काँग्रेसच्या वतीने भाजपाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, जयंत आसगावकर आदी आमदार, शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

आणखी वाचा-निवडणूक तयारीसाठी मुख्यमंत्री शिंदे शुक्रवारी कोल्हापूरात

कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी यावेळी तीव्र भावना व्यक्त केल्या. मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. आंदोलनामध्ये काँग्रेसचे बाजीराव खाडे, बाळासाहेब खाडे, अंजना रेडेकर, सरलाताई पाटील, सुप्रिया साळोखे, सूर्यकांत पाटील बुदिहाळकर, शशांक बावचकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.