लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्ष असलेल्या येथील विवेकानंद महाविद्यालयात सोमवारी गमछा, हिजाब यावरून मोठा वाद झाला. भगवा गमजा घातलेल्या विद्यार्थ्याला प्राध्यापकांनी वर्गातून बाहेर काढल्यानंतर विद्यार्थी संतप्त झाला. त्याने हिजाब परिधान करून वर्गात कोणी बसत असेल तर मी गमछा का काढावा असा प्रतिप्रश्न केल्याने वादाला तोंड फुटले. हिंदुत्ववादी संघटनांनी जय श्रीराम असे नारे दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बापुजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीद असलेल्या येथील विवेकानंद महाविद्यालयात हा प्रकार घडला. सत्यपाल विश्नोई नावाचा एक विद्यार्थी गळ्यात ‘ओम जय श्रीराम’ असे अक्षरे असलेला भगवा गमछा घालून वर्गात बसल्याने त्यावरून प्राध्यापकांनी हटकले. त्यावरून बाहेर जाण्याची सूचना केल्यावर विद्यार्थ्यांने गमछा पूर्वीपासून वापरतो, असे सांगत वर्गात मुली हिजाब परिधान करून बसतात; ते कसे चालते, असा प्रतिप्रश्न केला.
आणखी वाचा-ऐन पावसाळ्यात कोल्हापूरकरांवर पाण्यासाठी पायपीट; गळतीने त्रस्त
महाविद्यालयात आंदोलन
ही माहिती समाज माध्यमातून अग्रेषित झाली. याची माहिती मिळताच सेवाव्रत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडा साळुंखे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात जावून आंदोलन छेडले. महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली. जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. या प्रकाराने वातावरण तणावपूर्ण बनले. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
प्राध्यापक सक्तीच्या रजेवर
प्राचार्य रमेश कुंभार यांच्याशी चर्चा करताना बंडा साळुंखे, हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. हिंदू विद्यार्थ्यांने भगवा गमछा घालून वर्गात बसने गैर कसे ठरते, त्यावरून शिक्षकाने वर्गातून बाहेर का काढले, अशी विचारणा केली. कुंभार यांनी आंदोलकाच्या भूमिकेला समर्थन देवून व्यक्तिगत कपडे वापरण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. संबंधित कॉमर्स विषयाचे प्रा. यु.डी. दबडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.