कोल्हापूर :  हेर्ले येथील घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी इचलकरंजीत हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला. मोर्चा नंतर जमावाने रस्त्यावर विक्री करणारे हातगाडे उलटे करत संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे सायंकाळी शांतता कमिटीचे आयोजन करण्यात आले आहे.

हेर्ले येथे महापुरुषांचे पोस्टर दोषींवर कडक कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी इचलकरंजी येथे आज हिंदुत्ववाद्यांच्यानी मुख्यमार्गावरून अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा धडकला. अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

हेही वाचा >>> हेर्ले येथील अनधिकृत प्रार्थनास्थळ पाडण्यास सुरुवात

त्यानंतर मोर्चा सांगता झाली. जमावाने मलाबादे चौक परिसरात फळ विक्री सुरू असल्याने गाडा उलटवला. त्यानंतर शिवतिर्थावर प्रेरणामंत्र झाले. पुन्हा जमाव गांधी पुतळ्याचे दिशेने फिरला असता तेथे फळ विक्री करत असल्याचे पाहून जमावाने हातगाडे उलटुन टाकले. यामुळे काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व्यावसायीकांनी व्यवहार बंद ठेवले होते. एस.टी. वाहतुक काहीकाळ बंद होती. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारनंतर सर्व व्यवहार पूर्वपदावर आले. परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस व प्रशासनाच्या वतीने सायंकाळी शांतता कमिटीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक सुरू असून याकडे लक्ष लागले आहे.

Story img Loader