नजरचुकीने खोकल्याच्या औषधाऐवजी कीटकनाशक प्राशन केल्याने महेंद्र विठ्ठल पाटील (वय १४, रा. मेतके, ता. कागल) याचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली. महेंद्र मुंबई येथे सातवीमध्ये शिक्षण घेत होता. सुट्टीसाठी तो मेतके येथे गावी आला होता. गुरुवारी दुपारी खोकल्याचे औषध समजून महेंद्रने नजरचुकीने कीटकनाशक प्राशन केले होते. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.
आणखी वाचा