लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोल्हापूर : एसटी सहकारी बँकेचा कारभार मनमानी पद्धतीने करीत असल्याने वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कारभाराला एसटीचे कर्मचारी कंटाळले आहेत. त्यांच्याशी संलग्न असलेली कोल्हापुरातील संभाजीनगर येथील शाखा आज बरखास्त केली आहे. तर राज्यभरातील २५ हजारावर सभासद त्यांना रामराम ठोकणार आहेत, अशी माहिती एसटी बँकेचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, एसटी बँकेला उर्जितावस्था आणण्याच्या भूलथापा देऊन गुणरत्न सदावर्ते यांनी बँकेवर कब्जा मिळवला. आपल्या पत्नीला अध्यक्ष केले. मेहुणा सौरभ पाटील हा अपात्र असतानाही त्याला कार्यकारी संचालक करून दीड लाख रुपये वेतन आणि अन्य भत्ते असे तीन लाख रुपये मासिक मिळतील अशी तजबीज केली. या निवडी विरोधात माझ्यासह अनेकांनी तक्रार केल्यानंतर आज सहकार आयुक्तांनी ही निवड अपात्र असल्याचे नमूद करून सौरभ पाटील यांची हकालपट्टी केली आहे.
आणखी वाचा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याला पुन्हा गालबोट, तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
संघटनेची मुख्यमंत्र्यांशी सलगी
सदावर्ते यांनी त्यांना साथ देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची जाणीव न ठेवा मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताच्या बाबीचा शासनाकडे पाठपुरावा करण्याऐवजी न्यायालयीन वाद उद्भव निर्माण करणे, त्यासाठी निधी संकलन करून पैसे मिळवण्याचा प्रकार चालू ठेवला आहे. त्यांचे हे सर्व प्रकार हळूहळू लक्षात येऊ लागले असल्याने संभाजीनगर शाखा आज बरखास्त केली आहे. राज्यातील २५ हजारावर कर्मचारी संघटनेपासून बाजूला गेले आहेत. हे सर्व लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय कर्मचारी सेना युनियनमध्ये जानेवारी महिन्यात विलीन होणार आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.