कोल्हापूर: आज दिवसभरात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये राम महिमा पाहायला मिळत असताना तोच उत्साह दिवस मावळला तरी सुरू होता. सायंकाळी पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. तर करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर आकर्षक विद्युत रोशनी उजळून निघाले.
अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पंचगंगा काठी दीपोत्सव अन् महाआरती छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आली. यावेळी संभाजीराजे, मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.
आणखी वाचा-महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांसाठी राहुल नार्वेकरांची मोठी घोषणा, म्हणाले…
संपूर्ण पंचगंगा नदीघाट परिसरात २५ हजार दिव्याचा दिपोत्सव नागरिकांच्या सहभागाने उत्साहात पार पडला. भव्य आतषबाजीत हा सोहळा संपन्न झाला. मंदिर उजळले. अंबाबाई मंदिरामध्ये आज रामरूपात पूजा बांधण्यात आली. तर रात्री मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे मंदिरास परिसर उजळून निघाला.