कोल्हापूर : सुळकुड पाणी योजनेवरून चिथावणीखोर वक्तव्य करणारे राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘मी इचलकरंजीकर..  एक चळवळ पाण्यासाठी’  या चळवळीकडून अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कोल्हापूर : अजित पवार यांच्या कोल्हापुरातील सभेला लाखाच्या उपस्थितीचा दावा; दोन दिवसांतच आकड्यात दुपटीने भर

इचलकरंजीसाठी पाणी मिळावे यासाठी शासनाने दुधगंगा उद्भव सुळकुड पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. मात्र, सामान्य लोकांत दंगल घडवून हाणामारी व्हावी, याचा राजकीय फायदा मिळावा म्हणून राजकीय नेते चिथावणीखोर भाषणे करत आहेत. यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी रक्तपात होईल, तर माजी आमदार के. पी. पाटील यांनी कर्नाटकमधील नागरिकांना तलवारी घेऊन येण्याचे आवाहन केले. राजकीय मते मिळवण्यासाठी दंगल घडवून सामाजिक वातावरण त्यांना बिघडवायचे आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याची दखल घेऊन या दोन्ही नेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी, पाणी योजनेवरून दंगल घडल्यास या दोन्ही नेत्यांना जबाबदार धरावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अमित कुंभार, उमाकांत दाभोळे, विशाल माळी, मुकुंद तारळेकर अमोल् भोसले,प्रमोद पाटील, सुनील जाधव,रविकिरण हुक्कीरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demands for action against kp patil hasan mushrif for controversial statement over water scheme in ichalkaranji zws