लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी करीत असलेला माजी सभापती संजय तेलनाडे याला मोका नंतर आता हद्दपार कारवाईस सामोरे जावे लागत आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पडित यांनी मंगळवारी ७ जून पासून वर्षभर हद्दपारीचा आदेश बजावला आहे.
लोकसभा निवडणूक निवडणुकीवेळी संजय तेलनाडे हा महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये सक्रिय होता. आगामी विधानसभा निवडणूक तो आघाडी कडून लढण्यासाठी इच्छुक आहे. यापूर्वी त्याने तसेच त्याचा भाऊ सुनील याने इचलकरंजी नगरपालिकेमध्ये निवडणूक जिंकली आहे. आता तो आमदार होण्याची हालचाली सुरू असताना वर्षभरासाठी हद्दपार कारवाई झाल्याने राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह उमटले आहे.
आणखी वाचा-कोल्हापुरात पाऊस; पेरणीची धांदल
कारवाई कशासाठी?
इचलकरंजी, जिल्ह्यात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये एसटी सरकार टोळी नावाने कुख्यात टोळीचा प्रमुख संजय शंकरराव तेलनाडे, टोळीचे सक्रिय सदस्य अरविंद शिवकुमार मस्के, राकेश सुरेश कुंभार, दीपक सतीश कोरे, इमरान दस्तगीर कलावंत ,आरिफ दस्तगीर कलावंत व अभिजीत सुभाष जामदार यांच्यावर कारवाई केली आहे.
या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी टोळीने परिसरात वास्तव्यामुळे बाधित झालेले सामाजिक स्वास्थ्य पुनर्प्रस्थापित करण्यासाठी ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. तेलनाडे टोळीने खून,खुनाचा प्रयत्न, दरोडा ,जबरी चोरी ,खंडणी, बलात्कार, विनयभंग, सरकारी नोकऱ्यांवर हल्ले, फसवणूक, गर्दी ,मारामारी, गंभीर दुखापत मालमत्तेचे नुकसान, अवैध जुगार आदी गुन्ह्यामध्ये अडकले आहेत.समाजामध्ये दहशत माजवणे व सामाजिक स्वास्थ्य स्वागत निर्माण करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने ७ जून पासून सात जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करीत असल्याचे म्हटले आहे.
आणखी वाचा-कोल्हापूर महापालिकेची कामे संथगतीने; पण बदनामी शासनाची – राजेश क्षीरसागर
मोकाची कारवाई
संजय तेलनाडे याला मटकाचालक सलीम हेपरगी याच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यातून तो निर्दोष बाहेर पडला. त्यानंतर भरत त्यागी खूनप्रकरणी त्याला अटक झाली. इचलकरंजीमध्ये तो मटका किंग राकेश अग्रवाल याच्याशी हातमिळवणी करून मटका-जुगार चालवत होता. दरम्यान, मटका अड्ड्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संजय तेलनाडे साथीदारांसह पसार झाला होता. पुढे, संजय तेलनाडे ‘एस.टी.’ गुन्हेगारी टोळीचा तो म्होरक्याही असल्याने तसेच मटका, हाणामारी, दहशत पसरवणे, खंडणी उकळणे असे गंभीर गुन्हे या टोळीविरोधात दाखल झाल्याने या टोळीविरोधातील ‘मोक्का’ कारवाईच्या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मे २०२९ मध्ये मंजुरी दिली. त्यानंतर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी संजय व सुनील तेलनाडे बंधुसह अन्य आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केली होती.
आणखी वाचा-कोल्हापूर शहराचे बकालीकरण करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलनाला सुरुवात
राजकीय कारवाई ?
दरम्यान माझ्यावर होत असलेली कारवाई राजकीय स्वरूपाची आहे. माझा वाढणारा लोकसंपर्क केला प्रतिसाद यामुळे हितशत्रूंनी हे कृत्य केले आहे. मात्र या निर्णयाला गृह विभागाकडे आव्हान देणार असल्याचे संजय तेलनाडे याने म्हटले आहे.