कोल्हापूर जिल्ह्य़ातील ठेवी, कर्ज वाटपात वाढ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गत आíथक वर्षांमध्ये जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असली तरीही आíथक व्यवहार वाढल्याचे दिसते. वार्षकि पतपुरवठा आराखडानुसार जिल्ह्यातील सर्व बॅंकांच्या ठेवी मध्ये १ हजार १९६ कोटींनी वाढ होऊन त्या १९ हजार ३९१ कोटी झाल्या. कर्जामध्ये ९६३ कोटीची वाढ होऊन जिल्ह्यामध्ये प्राथमिकता क्षेत्रासाठी दिलेल्या कर्जाची रककम १५ हजार ७६९ कोटी इतकी झाली आहे.
वार्षकि पतपुरवठा आराखडा वर्ष २०१५-१६ चा आढावा घेताना अग्रणी जिल्हा व्यवस्थापक एम.जी.कुलकर्णी यांनी सांगितले, की जिल्ह्यातील प्राथमिकता सेवा क्षेत्रा करीता ५०४० कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मार्च २०१६ साठी दिलेल्या उद्दिष्टाच्या ५१२४ कोटीचा वित्त पुरवठा प्राथमिकता क्षेत्रा करीता जिल्ह्यातील सर्व बँकांनी केला आहे. मार्च २०१६ उद्दिष्टाच्या १०२ टक्के आहे. सन २०१६-१७ करीता वार्षकि पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये पीक कर्जासाठी २ हजार ६८८ कोटी इतके उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ५१ हजार खाती उघडण्यात आली असून मार्चअखेर १२ दावे मंजूर करण्यात आले आहेत. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत ३ लाख ४७ हजार खाती उघडण्यात आली असून आतापर्यंत ११३ दावे मंजूर करुन संबंधितांच्या वारसांना अडीच कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य करण्यात आले आहे .
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बठकीत ही माहिती शनिवारी देण्यात आली. जीवन ज्योती योजनेत दावा पात्रताही ४५ दिवसांची करण्यात आल्याने पॉलिसी सुरु झाल्यापासून ४५ दिवसानंतर दावा मंजूर करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. कोल्हापूरमध्ये आíथक साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले असून या केंद्रामार्फत वेगवेळ्या गावांमध्ये बँकींग साक्षरतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आíथक साक्षरतेसाठी महिन्यातून किमान एकवेळ ग्रामीण भागात कार्यक्रम घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी या वेळी स्पष्ट केले.