कोल्हापूर : देशाच्या प्रधानमंत्री पदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान झालेले आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मोदी यांनीच मिळवलेला असून समाजाच्या विकासासाठी हे सरकार निश्चितपणाने कटिबद्ध राहील. तथापि, लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणात फार काळ गुंतून न राहता आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी येथे केले.
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात आज बूथ रचना कार्य योजना अभियानाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन केले जात आहे. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, समन्वयक राहुल चिकोडे, माजी मंत्री भरमु सुबराव पाटील हे प्रमुख उपस्थित होती.
आणखी वाचा-किसान सभेचा राज्यव्यापी संघर्ष सप्ताह उद्यापासून सुरू; दररोज आंदोलने
यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक पुढे म्हणाले, बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी भविष्यकाळात बूथ मजबूत केल्यास विधानसभा निवडणुकीला यश मिळवणे सोपे जाईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणात फार काळ गुंतून न राहता आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन आजचा ठराव मांडला त्यास ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई व महिला जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम यांनी अनुमोदन दिले .
यावेळी माजी मंत्री भरमु सुबराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मेजर भिकाजी जाधव, के एन पाटील, हंबीरराव पाटील, हेमंत कोलेकर, संग्रामसिंह कुपेकर, संभाजी आरडे, राधानगरी अध्यक्ष विलास रणदिवे, भुदरगड अध्यक्ष अनिल तळकर, करवीर अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे, पन्हाळा अध्यक्ष मंदार परितकर, गगनबावडा अध्यक्ष स्वप्निल शिंदे, आजरा अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, अप्पा लाड, राजू मोरे, शैलेश पाटील, गणेश देसाई, उमा इंगळे, किरण नकाते, विजय खाडे, भरत काळे, रोहित पोवार, अमर साठे, राजसिंह शेळके, संगीता खाडे, मंगला निपाणीकर, शीतल तिरुके, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, अभिजित शिंदे, सतीश घरपणकर, संतोष माळी, संदीप कुंभार, आजम जमादार, चंद्रकांत घाटगे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणखी वाचा-इचलकरंजीत धाकल्या पाटलांच्या बैलाने तोडला कर
प्रारंभी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्य प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर एक पेड माँ के नाम कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. स्वागत महानगर सरचिटणीस डॉ. राजवर्धन यांनी केले आभार जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी मानले.