कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाची ताकद नगण्य आहे. जे काही करायचे आहे ते निवडणुकीच्या रिंगणात करुन दाखवू असे म्हणत सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना आव्हान दिले आहे. त्यांचे हेच आव्हान धनंजय महाडिक यांनी स्वीकारले असून आम्ही रणांगण सोडलेले नाही. आणखी ताकतीने येणार आहोत, असे खासदार धनंजय महाडिक म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> “…तर ओबीसींना फटका बसू शकतो,” विरोधकांनी जनगणनेवर आक्षेप घेताच छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ विनंती
जे काही करायचे आहे ते निवडणुकीच्या रणांगात करु असे सतेज पाटील म्हणाले होते. पाटील यांच्या या विधानानंतर पत्रकारांनी धनंजय महाडिक यांना छेडले. त्यानंतर महाडिक यांनी “आम्ही कुठे रणांगण सोडले आहे. आम्ही रणांगणात आणखी ताकतीने येणार आहोत,” अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्यातील आव्हान-प्रतिआव्हानाचा सामना रंगताना दिसत आहे.
हेही वाचा >>> अजित पवारांना भाषण करु न दिल्याबद्दल बोलताना भुजबळांकडून पंतप्रधानांचं कौतुक; म्हणाले, “तो मोदींचा मोठेपणा पण…”
सतेज पाटील काय म्हणाले होते?
राज्यसभा निवडणुकीतील यशानंतर धनंजय महाडिक व भाजप यांची कोल्हापूर जिल्ह्यात ताकत वाढली आहे. त्याचा प्रभाव आगामी काळातील निवडणुकीत दिसेल, असा दावा भाजप व महाडिक गटाकडून केला जात आहे. यावर सांगली येथे पत्रकारांनी विचारणा केली असता सतेज पाटील यांनी, “जे काही करायचे ते निवडणुकीच्या रणांगणात करून दाखवू. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे,” असे सांगत भाजपची ताकद नगण्य असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता.