भारतीय बँकिंगच्या इतिहासात आज प्रथमच बँकिंग कामकाज आणि आíथक उलाढालीशिवाय शनिवारचा दिवस गेला. बँकिंग सेवा न मिळाल्याने ग्राहकांनी नाके मुरडली. तर दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षमपणे रुजू होऊ असा विश्वास बँकिंग कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. त्यांनी या सुटीची गरज असल्याचे सांगितले.
गेली अनेक दिवस बँकांना दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याचा विचार चच्रेत होता. सरकारी आस्थापनांना या दिवशी सुटी असल्याने ती बँकिंग कर्मचाऱ्यांनाही मिळावी अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेरीस ती मान्य झाली. त्यानुसार आज बँकेला पहिली सुटी मिळाली. त्यावर बँक ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात भिन्न प्रतिक्रिया उमटल्या.
बँकिंग सेवा न मिळाल्याने ग्राहकांतून नाराजीचा सूर उमटत होता. स्पध्रेत सक्षम होण्यासाठी २४ तास बँकिंग देण्याचा विचार बँकेचे अभ्यासक मांडत असताना महिन्यातून आणखी दोन सुटय़ा दिल्याने ग्राहकांना बँक सेवा मिळत नसल्याने त्याविषयी ग्राहकांनी नाके मुरडली. तर सलग दोन दिवसाच्या सुटीनंतर कर्मचारी नव्या दमाने ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी रुजू होतील. अधिक अंतरावर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सलग दोन दिवसांची सुटी मिळाल्याने त्यांने कौटुंबिक कामासाठी वेळ देण्यास मदत होणार असल्याचे एचडीएफसी बँकेचे नाना रेवडे यांनी सांगितले.
या प्रश्नाकडे बँकिंग क्षेत्रातील अभ्यासक किरण कर्नाड यांनी विश्लेषणात्मक मत मांडले. बँकिंग रीसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट या क्षेत्रात काम करणारे कर्नाड म्हणाले, शनिवारी अर्धा दिवस सुटी मिळत असली तरी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात सायंकाळपर्यंत काम करावे लागत होते. इतर दिवशीही सात ते आठ वाजेपर्यंत बँकांचे काम चालते. आता सलग दोन दिवसांची विश्रांती मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमेतत सुधारणा होईल. अलीकडे सर्व राष्ट्रीयीकृत बँकांद्वारा पसे भरणे, काढणे, धनादेश भरणे अशी सेवा उपलब्ध झाल्याने एका अर्थाने ग्राहकांना बँकिंग सेवा २४ तास उपलब्ध झाली आहे. राज्यातील ५५० नागरी सहकारी बँकांमध्येही ५० टक्के एटीएम असल्याने तेथे पसे काढण्याची सोय असल्याने या ग्राहकांनाही फारशी अडचण येणार नाही. अमेरिकेत तर शुक्रवारी अर्धी आणि शनिवार, रविवार अशी दोन दिवसांची सुटी असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
बँक सुटीने ग्राहकांची गैरसोय तर कर्मचारी खुशीत
बँकिंग सेवा न मिळाल्याने ग्राहकांतून नाराजीचा सूर
Written by अपर्णा देगावकर
First published on: 13-09-2015 at 04:00 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disadvantage to customer due to bank holiday