कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या बुधवारी दिवसभर मुक्काम असताना त्यांच्यासमोर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक मतदारसंघात महायुती अंतर्गत उमेदवारी मिळण्यावरून सुरू झालेली धुसफूस रोखण्याचे कडवे आव्हान असणार आहे. पालकमंत्री, दोन आमदार, तीन माजी आमदारांसह डझनभर इच्छुकांत जबर स्पर्धा असल्याने बंडाचे झेंडे फडकावण्याची भाषा होऊ लागल्याने वादाला आवर कसा घातला जाणार हे लक्षवेधी ठरले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रात ५८ पैकी ३५ जागांवर विजय मिळवण्याचा इरादा ज्या कोल्हापुरातून केला त्याच जिल्ह्यात महायुतीतील उमेदवारीचा वाद उफाळला आहे. चंदगडमध्ये अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील आणि फडणवीस समर्थक शिवाजी पाटील तसेच करवीर मध्ये एकनाथ शिंदे, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी पुढे आणलेले संताजी घोरपडे यांच्यात उमेदवारीची स्पर्धा बंडाकडे नेणारी आहे.

Sangli district, political supremacy in Sangli district,
सांगलीतील संघर्ष मुद्द्यांवरून गुद्द्यांवर !
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Former MP Rajan Vichare criticizes Chief Minister Eknath Shinde regarding guardian minister of Thane district
ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री साताऱ्याचा कशाला? माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
मंत्रालयात विधानसभा उपाध्यक्षांसह आमदारांच्या जाळ्यांवर उड्या मुख्यमंत्री भेट देत नसल्याने टोकाचे पाऊल
Protest by farmers and orchardists in front of the district magistrate office
सावंतवाडी: शेतकरी व फळ बागायतदारांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडत शक्ती प्रदर्शन
father rape daughter
सातारा: खटाव तालुक्यात ज्येष्ठाचा चिमुरडीवर अत्याचार, घटनेने संताप; आरोपीला कोठडी
Ladki bahin yojana BJP workers meeting Marathwada
‘लाडक्या बहिणीं’चे भाजपकडून तीन हजार मेळावे
Violation of noise rules, Kolhapur, noise Kolhapur,
कोल्हापुरात मिरवणुकीत ध्वनी नियमांचे उल्लंघन

आणखी वाचा-नृसिंहवाडीत वयस्कर भाविकांसाठी दर्शन सुलभ; पायरीची उंची सोयीस्कर

मुश्रिफांना विरोध

समरजित घाटगे यांनी शरद पवार राष्ट्रवादी गाठल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोरील उमेदवारीची धोंड बाजूला गेल्याचे दिसत होते. मात्र मंगळवारी माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात प्रतिकूल वातावरण असल्याने ते कागल मध्ये पराभूत होतील, अशी शक्यता व्यक्त करीत आपल्यालाच उमेदवारी द्यावी, असे विधान करीत बड्या नेत्यांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला नव्या वादाला तोंड फोडले आहे.
आवाडे लटकलेलेच

आमदार प्रकाश आवाडे यांचा अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश झाला असला तरी अद्याप त्यांना इचलकरंजीतील पक्ष कार्यालयाचा दरवाजा उघडलेला नाही. येथे महायुती अंतर्गत आमदार पुत्र राहुल आवाडे, भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, अजितदादांचे समर्थक महानगर अध्यक्ष विठ्ठल चोपडे अशी स्पर्धेची मोठी रांग असल्याने उमेदवारीवरून तणाव आहे.

आणखी वाचा-मोदींनी कितीही विरोध केला तरी जाती जनगणना करणारच – राहुल गांधी

शहरातही रस्सीखेच

उत्तर व दक्षिण असे कोल्हापूरचे दोन्ही मतदारसंघ तर तापलेले आहेत. उत्तर मध्ये एकनाथ शिंदे समर्थक माजी आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे पोट निवडणुकीचे उमेदवार सत्यजित कदम, प्रदेश सचिव महेश जाधव, माजी महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी उमेदवारीसाठी मोट बांधल्याने चुरस वाढली आहे. खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज यांनी दोन्ही ठिकाणी तयारी चालवली आहे. याला शह देण्यासाठी दक्षिणमध्ये पुत्र ऋतुराज यांचा संपर्क राजेश क्षीरसागर यांनी वाढवला आहे. दक्षिणमध्ये भाजपचे माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक यांच्याबरोबरीने स्पर्धेत आणखी एक नाव जोडले गेले आहे. महायुती अंतर्गत जिल्ह्यातील उमेदवारीची स्पर्धा काटेरी वळणावर आल्याने हा वाद कसा हाताळला जातो, यावरच यश अवलंबून असणार आहे.