कोल्हापूर : कोल्हापुरात लोकसभा निवडणूक मतमोजणी वेळी राजकीय कार्यकर्ते ‘आधे  इधर आधे उधर’ अशी स्थिती असणार आहे. जिल्हा प्रशासनाने सोयीसाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना वेगवेगळ्या नेमून दिलेल्या ठिकाणीच उभे राहावे लागणार असल्याचे शनिवारी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हयातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी  दिनांक ४ जून  रोजी मतमोजणीच्या ठिकाणी येणा-या उमेदवारांसोबत त्यांचे समर्थक, वाहने, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी बहुउद्देशिय हॉल, शासकीय धान्य गोदाम, रमणमळा, कोल्हापूर येथे व हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी शासकीय गोदाम, राजाराम तलाव, कोल्हापूर येथे मंगळवार दिनांक ४ जून रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ अन्वये  बहुउददेशिय हॉल, शासकीय धान्य गोदाम, रमणमळा, कोल्हापूर व शासकीय गोदाम, राजाराम तलाव, कोल्हापूर परिसरात दिनांक ४ जून २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.

हेही वाचा >>> कोल्हापुरात निवडणूक निकालावरून गप्पांचे फड रंगले; लाखमोलाच्या पैजा

आधे  इधर आधे  उधर

कोल्हापूर लोकसभा मतदार संघाकरीता होणाऱ्या मतमोजणीसाठी बहुउद्देशिय हॉल, शासकीय धान्य गोडावून समोर, रमणमळा या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी रमणमळा पोस्ट ऑफिस चौक, पितळी गणपती चौक, पोवार मळा, भगवा चौक या ठिकाणापासून पुढे जाण्यासाठी (भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडित कर्मचारी, उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेले मतमोजणी प्रतिनिधी वगळून) मज्जाव करण्यात येत आहे. पितळी गणपती चौक येथे शिवसेना व इतर संलग्न पक्ष व महायुतीचे कार्यकर्ते थांबतील त्यांच्या व्यतिरिक्त इतर पक्षाच्या उमेदवार/निवडणूक प्रतिनिधी/कार्यकत्यांना येथे थांबण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे. मेरीवेदर ग्राऊंड कोल्हापूर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते येथे थांबतील या व्यतिरिक्त इतरांना येथे थांबण्याकरीता मज्जाव करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> रंकाळा तलावात पुन्हा मृत माशांचा खच; कोल्हापूर महापालिका यंत्रणा सुस्तच

हातकणंगले लोकसभा मतदार संघाकरीता होणाऱ्या मतमोजणीसाठी, शासकीय गोदाम, राजाराम तलाव, कोल्हापूर या नियोजित ठिकाणी होणाऱ्या मतमोजणीकरीता पाटील मळा सरनोबतवाडी, विद्यापीठ टोल नाका कृषी विद्यापीठ परीसर या ठिकाणापासून मतमोजणी ठिकाणी जाण्यासाठी (भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडित कर्मचारी, उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेले मतमोजणी प्रतिनिधी वगळून) मज्जाव करण्यात येत आहे. शिवाजी विद्यापीठ गेट नं.१ समोर नॅनो सायन्स येथे शिवसेना व इतर संलग्न पक्ष व महायुतीचे कार्यकर्ते थांबतील त्यांच्या व्यतिरिक्त इतर पक्षाच्या उमेदवार/निवडणूक प्रतिनिधी/कार्यकत्यांनी येथे थांबण्याकरीता मज्जाव करण्यात येत आहे. युको बँक येथे शिवसेना ठाकरे गट व इतर संलग्न पक्ष या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते थांबतील त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना येथे थांबण्याकरीता मज्जाव करण्यात येत आहे. तसेच रेणुका मंदीर, सरनोबतवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर संलग्न पक्ष तसेच अपक्ष पक्षांचे  कार्यकर्ते थांबतील त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना येथे थांबण्याकरीता मज्जाव करण्यात येत आहे. मतमोजणी दिवशी मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर सभोवतालच्या परिसरात मतमोजणी कर्मचारी/पुरवठादार, उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेल्या प्रतिनिधी व्यतिरीक्त कोणाही व्यक्तिला प्रवेश करण्यासाठी मनाई.

मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय रस्त्यावर, व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करण्यासाठी मनाई. आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, चित्रे, चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करणे.

मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर परिसरामध्ये मोटरगाड्या, वाहनांचा वापर करणे अथवा थांबविण्यासाठी. (निवडणुकीच्या अनुषंगाने वापरात असलेली शासकीय वाहने वगळून.) मतमोजणी ठिकाणाच्या २०० मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक सहित्य बाळगणे, वापरणे. (भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडित कर्मचारी वगळून.) मतमोजणी ठिकाणी मतमोजणी प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District administration arrange different places for different political parties workers on counting day zws
Show comments