कोल्हापूर : कसबा बावडा येथील शासकीय पुरुष राज्यगृह तसेच शासकीय तेजस्विनी महिला वसतिगृह या दोन्ही संस्थांना पाच-पाच गुंठे जागा संस्थेच्या इमारत बांधकामासाठी शेंडा पार्क येथे देवू. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील ३ टक्के निधीतून प्रस्ताव मागणी करावी, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.जिल्हा पुनर्वसन समिती, जिल्हा बालकल्याण व जिल्हा बालसंरक्षण समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, समिती सदस्य ॲड. शिल्पा सुतार, पद्मजा गारे, अश्विनी खाडे, प्रतिनिधी, अधीक्षक उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले, बालगृहे, निरीक्षणगृहे, महिला आधारगृहे यातून आवश्यक सेवा व सुविधा देवून तेथील मुला-मुलींना स्वयंपूर्ण होण्यासाठी चांगले शिक्षण मिळेल यासाठी नियोजन करावे. बालविवाह होऊ नये म्हणून वारंवार गुन्हे घडत असलेल्या ठिकाणांची माहिती संकलित करावी. बालविवाह पथकात प्राधान्याने पोलिसांचा समावेश करून ते रोखण्यासाठी ग्रामस्तरावरील पोलीस पाटील व ग्रामसेवक यांना लेखी कळवावे.

Story img Loader