कोल्हापूर : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. बुद्धिमान अर्थतज्ज्ञ हरपल्याची भावना व्यक्त करण्यात आली.इचलकरंजी काँग्रेस भवनात डॉ. सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. शहराध्यक्ष संजय कांबळे, प्रदेश सचिव शशांक बावचकर, राहुल खंजीरे, मदन कारंडे, सागर चाळके, अजित जाधव, प्रकाश मोरबाळे, उदयसिंह पाटील, भरमा कांबळे उपस्थित होते.

आर्थिक स्थैर्य – सतेज पाटील

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने अर्थतज्ज्ञ, नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श गमावला आहे. आधुनिक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आणि प्रगतीचा नवा अध्याय लिहिणारे डॉ. सिंग यांचे साधे राहणीमान, वैचारिक बैठक प्रेरणादायी आहे, असे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

kolhapur sugar marathi news
विक्री हमी दरवाढीअभावी साखर उद्योग अडचणीत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Corbin Bosch smashed highest score at number 9 in test cricket history against pakistan match
SA vs PAK : दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने केला कहर! पदार्पणातच ‘हा’ विश्वविक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
Double tax on awards Remembering Dr Manmohan Singh decision making skills Kolhapur news
पुरस्कारावरील दुहेरी कर आणि इचलकरंजी भेट! डॉ. मनमोहन सिंग यांच्या निर्णयचातुर्याचे स्मरण
Former Prime Minister of India Manmohan Singh
अग्रलेख: मार्दवी मार्तंड!
India Former PM Dr. Manmohan Singh Funeral Highlights
Dr. Manmohan Singh Funeral Highlights: डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन; निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
what made us happy in 2024 Review of 2024 Year year 2024 year ender 2024
सरणारे वर्ष मी…

हेही वाचा >>>इचलकरंजी सुवर्णमहोत्सवी साहित्य स्मृती ट्रस्टचा सुवर्ण महोत्सव

निष्णात अर्थतज्ज्ञ – धनंजय महाडिक

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक निष्णात अर्थतज्ज्ञ म्हणून देशाला दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही. काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत आणि देशाच्या प्रगतिशील वाटचालीमध्ये त्यांचे योगदान मोठे आहे, अशा भावना खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >>>विक्री हमी दरवाढीअभावी साखर उद्योग अडचणीत

सिंग शेतकऱ्यांसाठी किंग – राजू शेट्टी

पुणे येथे तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या बैठकीस शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होण्याची संधी मला मिळाली. सरकारच काय, तर समाजही या शेतकऱ्यांचे देणे लागतो, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. ते पंतप्रधान असताना शेतकरी आत्महत्या व शेती व्यवसायातील अडचणी यावर उपाययोजना शोधण्यासाठी एम. एस. स्वामिनाथन शेतकरी आयोगाची स्थापना केली. मी लोकसभेचा सदस्य असताना साखर नियंत्रण कायद्यात त्यांनी रास्त दुरुस्ती केल्यानेच आज ऊसउत्पादकांना एफआरपी मिळत आहे. त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांसाठी ७० हजार कोटींची कर्जमाफी झाली होती. साखर कारखानदार काटमारी करीत असल्याची तक्रार मी संसदेत मांडल्यावर त्यांनी खासदार निधीतून वजनकाटे बसविण्यास परवानगी दिली होती, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

Story img Loader