ग्राहक कल्याण सल्लागार समितीची मागणी
हॉटेलमध्ये शुद्ध पाणी मिळावे यादृष्टीने ‘इथले पाणी पिण्यास योग्य आहे’ असा फलक दर्शनी भागात लावण्याची सक्ती अन्न औषध प्रशासन विभागाने करावी, असा आदेश राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे येथे बोलताना दिला.
प्रवासी ग्राहकांकडून रिक्षा भाडे हे मीटरनुसारच घेणे बंधनकारक असून, रिक्षाचालकाने ग्राहकांना भाडे नाकारणे हा कायदेशीर गुन्हा असल्याचे स्पष्ट करत त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले .
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बठकीत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे बोलत होते. बठकीस जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य-सदस्या उपस्थित होते.
ग्राहक हा राजा असून, या ग्राहकराजाची फसवणूक अथवा अडवणूक होणार नाही याची सर्वानीच दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश देऊन देशपांडे म्हणाले, ग्राहक हितात असणाऱ्या सर्व कायद्यांची माहिती ग्राहकाला होणे गरजेचे असून, यासाठी यंत्रणांनी आणि चळवळीतील मान्यवरांनी समन्वयाने सक्रिय व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
अन्न औषध प्रशासनाने अन्न उत्पादने तसेच खाद्यपदार्थ योग्य, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण ग्राहकांना मिळतील यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी सूचना करून देशपांडे म्हणाले, तसेच हॉटेलमधील खाद्यपदार्थ तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंबाबत काही तक्रार, अडचण असल्यास ग्राहकांनी १८००२२२३६५ या टोलफ्री क्रमांकावर तक्रार नोंदवाही. हातगाडय़ा तसेच छोटय़ा विक्रेत्यांसाठी जिल्ह्यात नजीकच्या काळात अन्नसुरक्षा प्रणाली राबवण्याचा प्रयत्न असल्याचे अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृषी विभागाची भरारी पथके
शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री ही सीलबंद पिशवीतूनच करणे बंधनकारक असल्याचे सांगून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी म्हणाले, येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारी खते, बियाणे आणि कीटकनाशके वेळीच आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. शेतकऱ्यांची येत्या खरिपात कसल्याही प्रकारे अडवणूक अथवा फसवणूक होणार नाही यासाठी कृषी विभागाने भरारी पथके तनात केली आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drinking water board make it compulsory on hotel operators
Show comments