लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाई: साताऱ्यात करोनाचे रुग्ण वाढल्याने नागरिकांना मुखपट्टी वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सायंकाळी केले आहे. साताऱ्यात करोनाचे उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात नव्याने करोनाचे पन्नास रुग्ण मागील काही दिवसात निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी वापरणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला.

साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर आता सर्व शासकीय,निमशासकीय, शाळा,बँकांमध्ये मास्क वापरणे बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.साताऱ्यात करोनाचे पन्नास रुग्ण मागील काही दिवसात नव्याने निष्पन्न झाल्याने व दररोज रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

या पार्श्वभूमीवर शासनाकडून प्रतिबंधात्मक उपायांची खबरदारी घेतली जात आहे. अशातच, साताऱ्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत. तसेच, नागरिकांना मुखपट्टी वापरण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.साताऱ्यात करोनाचे उपचार घेणाऱ्या फलटण तालुक्यात व साताऱ्यात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the increase in corona patients in satara it is mandatory for citizens to wear masks mrj
Show comments