शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षेसाठीची धावपळ थांबणार
शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा व इतर योजनांचे लाभ घेण्यासाठी विध्यार्थी, पालकांची धावपळ आता थांबणार आहे. शासनाने याकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ई-स्कॉल पोर्टल सुरू केले असल्याने घरबसल्या काम होण्यास मदत होणार असल्याचे येथे गुरुवारी सांगण्यात आले.
या चालू शैक्षणिक वर्षांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा व इतर योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ई-स्कॉल पोर्टल सुरू केले आहे.
शिष्यवृत्ती अर्ज भरणे व अर्ज नूतनीकरण करणे याबाबतचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. वेळापत्रक जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयांनी नोटीस फलकावर प्रसिध्द करून वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे व महाविद्यालयाच्या वतीने द्वितीय वर्षांतील अर्ज नूतनीकरण करून ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. मॅट्रीकपूर्व सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी दिनांक १५ जून ते ३० नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे प्रथम वर्ष उत्तीर्ण होऊन द्वितीय वर्षांतील प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाने नूतनीकरण दि. १ जून ते ३० नोव्हेंबर पर्यंत करावे लागणार आहे.
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नवीन प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज १ जुल ते ३० नोव्हेंबपर्यंत भरणे आवश्यक आहे. नवीन विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयाकडे ऑनलाईन आणि पडताळणीकरिता प्रस्ताव दि. १५ जुल ते १५ डिसेंबर या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे.
ज्या महाविद्यालयांना नवीन मान्यता मिळालेली आहे किंवा सिस्टीमवर असलेल्या महाविद्यालयास नवीन अभ्यासक्रमास मान्यता मिळालेली आहे अशा प्रकरणी ई-स्कॉल सिस्टीमवर सन २०१६-१७ साठी मॅिपग करणे आवश्यक आहे.