कोल्हापूर: राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पूरक वातावरण निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी उमेदवारांना मतदार जनतेकडून चांगला आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला एकही जागा जिंकता येणार नाही, असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली.देशाच्या जडणघडणीमध्ये आणि विकासामध्ये काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे. मात्र केंद्र सरकारकडून गेल्या दहा वर्षात केवळ दारांच्या विकासाचा राबवण्यात आला आहे,असे सचिन सावंत यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा-जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देश हितासाठी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन पंतप्रधानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. विरोधी पक्षातील एकाही नेत्यांना देशहितासाठी साधी आपली करंगळी सुद्धा कापली नाही, अशी टीकाही सचिन सावंत यांनी केली.
या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असा दावाही सचिन सावंत यांनी केला आहे. पत्रकार परिषदेला सचिन चव्हाण, संजय पवार वाईकर, संपतराव चव्हाण पाटील, भारती पाटील, बाबुराव कांबळे उपस्थित होते.