कोल्हापूर :छत्रपती राजाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरणासह लोकार्पण  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झालेले आहे. या विमानतळाचे संस्थापक छत्रपती राजाराम महाराजांचे नाव विमानतळास देण्यासाठी आपण पंतप्रधानांच्याकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ललित गांधी यांना दिली.

कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल च्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली राज्याच्या व्यापार, उद्योग क्षेत्राच्या वतीने विमानतळाच्या लोकार्पणानिमित्त त्यांना धन्यवाद देऊन त्यांचा सत्कार केला व या विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव  देण्यासाठी गेल्या वीस वर्षापासून केलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन सर्व स्तरावर हा निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणी तात्काळ होण्यासाठी आपण पंतप्रधानांच्याकडे शिफारस करावी अशी मागणी ललित गांधी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कडे केली, त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपण पंतप्रधानांच्याकडे याविषयी पाठपुरावा करू व कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करून घेऊ असे आश्वासन दिले.

Due to low response to half marathon police are forced to fill 300 applications and focus on ticket sales affecting law and order
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सोडून नागपुरातील ठाणेदार विकतायेत तिकीट…. प्रत्येकाला तीनशे…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Forest Minister Ganesh Naik assurance regarding the name of Navi Mumbai International Airport
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव; वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
Nagpur airport loksatta news
नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर

हेही वाचा >>>केंद्रापाठोपाठ राज्य सहकारी बँकेचीही साखर उद्योगावर कुऱ्हाड; साखर मूल्यांकनातील कपातीसह कर्ज वसुलीच्या रकमेत वाढ

ललित गांधी यांनी याप्रसंगी राज्यातील विविध विमानतळांच्या विकासासाठी  केंद्र व राज्य सरकारकडे दिलेल्या प्रस्तावावर लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी ही मुख्यमंत्र्यांच्या कडे केली. याप्रसंगी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने,आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश यड्रावकर, विज्ञान मुंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Story img Loader