कोल्हापूर : महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, वीजतज्ञ प्रताप होगाडे यांचे सोमवारी इचलकरंजी येथे निधन झाले. समाजवादी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष पदावर होगाडे होते. तथापि त्यांची बहुतांशी राजकीय कारकीर्द ही जनता दलामध्ये घडली.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. उमेदीच्या काळामध्ये त्यांनी इचलकरंजी को-ऑपरेटिव्ह सिमेंट कंपनी, साधना सहकारी बँक, इचलकरंजी टेक्सटाइल, प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्क आदी विविध सहकारी संस्थांची स्थापना केली. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीमध्ये ते सहभागी झाले होते. पुढे त्यांनी जनता दलाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. या पक्षाचे ते प्रदेश उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रधान महासचिव अशी विविध पदे त्यांनी भूषवली होती. इचलकरंजी विधानसभा निवडणुकी त्यांनी या पक्षाकडून लढवली होती. अलीकडेच त्यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता. या पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते.

CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
man dies after falling into hole dug in Chembur by mumbai municipality
चेंबूरमध्ये पालिकेने खोदलेल्या खड्यात पडून इसमाचा मृत्यू, कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल
actress Sapna Singh teen son found dead in UP (1)
मित्रांबरोबर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत
S M krushna
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
Magnav taluka , Four people drowned, Kundalika river,
रायगड : कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू
Raghunath More, Raghunath More passed away,
शिवसेनेचे रघुनाथ मोरे यांचे निधन, दिघे यांच्या निधनानंतर साभांळली होती ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी

हेही वाचा – सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी

गेली तीस वर्षे ते वीज क्षेत्रामध्ये सक्रिय होते. या क्षेत्राचा त्यांचा दांडगा व्यासंग होता. एनरोन विरोधी लढा, विजेचे वाढते दर, त्यासाठी वीज नियामक आयोग, राज्य शासन, महावितरण यांच्याशी दिलेला लढा, उच्च न्यायालय – सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाखल केलेले दावे, विजेचे सामान्य नागरिक, उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेला पाठपुरावा यामुळे त्यांची प्रतिमा राज्यभर उंचावली गेली. त्यातूनच त्यांच्याकडे वीजतज्ञ म्हणून पाहिले जात होते. या कामाची दखल घेऊन त्यांना विविध सामाजिक संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

इचलकरंजीच्या सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. येथील मनोरंजन मंडळ उभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. या मंडळाचे वर्षभर सातत्याने गुणवत्तापूर्ण उपक्रम होत असतात. त्यामागे होगाडे यांचीच प्रेरणा होती.

हेही वाचा – काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी

अलीकडे इचलकरंजी शहराच्या दूधगंगा नळ पाणी योजनेच्या सुळकुड नळ पाणी कृती समितीचे ते समन्वयक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई, भाऊ असा परिवार आहे. उद्या मंगळवारी सकाळी आठ वाजता इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

Story img Loader