महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सवातील अडथळे शोधण्याच्या कामाची तसेच ताराबाई रोड व महाद्वार रोडवरील फेरीवाल्यांची पाहणी करून महापौर अश्विनी रामाणे यांनी मंगळवारी अडथळे दूर करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन दिले.
महापालिकेमार्फत केआयटी कॉलेजच्या माध्यमातून किरणोत्सवातील अडथळय़ाचा अभ्यास करण्याचे काम केआयटी महाविद्यालयास सोपवले आहे. याकामी महापालिकेने आवश्यक जागेचा नकाशा देण्यात आला होता. परंतु केआयटीस डिजिटल नकाशाची गरज असल्याने डिजिटल नकाशा उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार काम सुरू आहे. या कामाची महापौर रामाणे यांनी पाहणी केली.
तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरातील महाद्वार रोड व ताराबाई रोडची पाहणी केली. या वेळी या रस्त्यावरील फेरीवाल्यांची मते महापौरांनी जाणून घेतली. फेरीवाल्यांनी रस्त्याच्या कडेला व्यवसाय करण्यासाठी पट्टे मारून द्यावेत. आम्ही पट्टय़ाच्या आत व्यवसाय करून रहदारीस अडथळा न करता व्यवसाय करू अशी मागणी केली. या वेळी महापौरांनी महापालिकेने निश्चित केलेल्या हॉकर्स झोनमध्येच फेरीवाल्यांनी व्यवसाय करावा असे स्पष्ट केले.
या वेळी गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेविका उमा बनछोडे, दीपा मगदूम, वृषाली कदम, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, उपशहर अभियंता एस. के. पाटील, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, सचिन चव्हाण, उदय गायकवाड, केआयटी कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
महालक्ष्मी परिसरातील अडथळे दूर करणार
महापालिका प्रशासन प्रयत्नशील
Written by लोकसत्ता टीम
First published on: 20-01-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enchroachment will remove in mahalakshmi area