कोल्हापूर : येथील लक्षतीर्थ वसाहत परिसरातील आलिफ अंजुमन मदरसावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सकाळी कारवाईची मोहीम सुरु केली. या परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिक आणि महिलांनी या कारवाईला प्रचंड विरोध केला आहे. त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलिसांबरोबर हुज्जत घातली. याप्रकरणी मदरसा व्यवथापनाच्या अपिलावर २ फेब्रुवारी रोजी सुनावणी असताना त्यापूर्वीच कारवाई का केली जात आहे, असा सवाल करण्यात आला. कारवाई वेळी नागरिकांनी घोषणाबाजी केल्याने गोंधळात भर पडली. पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केले असले तरी या परिसरात तणावाचं वातावरण आहे.

काळजीपूर्वक हालचाली

अंजुमन मदरसा व सुन्नत जमात लक्षतीर्थ वसाहत ठिकाणी कारवाई हाेऊ नये यासाठी परिसरात माेठा जमाव जमा झाला होता. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढल्याने पाेलिसांनी लक्षतीर्थ परिसरात १४४ कलम लागू केले आहे. या परिसरात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. ओळखपत्र आहे त्यांनाच वसाहतीमध्ये साेडले जात आहे.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
bullock cart race
मुरुड समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीच्या सरावाचा थरार, पर्यटकांचा मात्र थरकाप
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई

हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवारीची दोन्ही मतदारसंघांत उत्सुकता वाढली

हेही वाचा – कोल्हापुरात महालक्ष्मी विकास आराखड्यावर अजित पवारांच्या भूमिकेवरून संतप्त भावना

कारवाई पुढे ढकलावी

दरम्यान लक्षतीर्थ वसाहत शांतता कमिटीने सदरची कारवाई पुढे ढकलावी अशी मागणी करणारे निवेदन कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासन यांना दिले आहे. या मदरसाविषयी या भागातील व्यक्ती व समाजाची कोणतीही तक्रार नाही. बाहेरील व्यक्ती व संघटनेच्या तक्रारीवर कारवाई होत आहे. यामुळे अतिक्रमण कार्यवाहीस मुदत वाढ मिळावी, अशी मागणी माजी नगरसेवक आनंदराव खेडकर, युवराज खंडागळे यांच्यासह शांतता कमिटी सदस्यांनी केली आहे.

Story img Loader