कोल्हापूर शहरातील अंतर्गत टोल आकारणी रद्द होण्यासाठी गेली ५ वष्रे सुरू असलेल्या लढय़ाला बुधवारी यश आल्याने करवीरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टोल रद्द करण्याच्या निर्णयाचे जल्लोषी स्वागत केले. या निर्णयावरून सत्तेचा घटक असलेल्या भाजप व शिवसेनेमध्ये श्रेयवादाची स्पर्धा रंगली. विरोधकांनी मात्र हात आखडता घेत निर्णयाचे स्वागत केले.
शहरातील अंतर्गत रस्त्यावरील टोल आकारणीचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. टोल देणार नाही, अशी भूमिका घेत टोलविरोधी कृती समितीच्या झेंडय़ाखाली सर्व पक्षीयांनी लढा उभारला होता. करवीरकरांसह जिल्ह्यातील लोकांचा टोलला असलेला विरोध लक्षात घेवून नव्या शासनाने टोल रद्द करण्याबाबतची भूमिका सुरुवातीपासून घेतली होती. बुधवारी हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरातील टोल आकारणी रद्द करीत असल्याच्या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयाचे शहरातील सर्वपक्ष, कृती समिती, समितीचे नेते अशा सर्वानीच स्वागत केले.
टोलविरोधी कृती समितीचे नेते एन.डी.पाटील यांनी टोलचा वादग्रस्त प्रश्न लोंबकळत न ठेवता निकाल दिल्याबद्दल शासन निर्णयाचे स्वागत केले. लोकशाहीत जनता श्रेष्ठ असते, जनतेच्या निर्णयापुढे शासनाला झुकावे लागते हा सिद्धांत आज पुन्हा दिसून आला. टोल श्रीमंत वर्गासाठी असताना हजारो सामान्य लोकांनी जनमताचा रेटा वाढवल्याने जनतेचे अभिनंदन केले पाहिजे.
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकरांच्या दृष्टीने हा दिवाळीसम निर्णय असल्याचे सांगत या ऐतिहासिक निर्णयाची नोंद सुवर्ण अक्षरांनी करावी लागेल, अशा शब्दांत स्वागत करतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांना निर्णयाचे श्रेय असल्याचे स्पष्ट केले. राज्याची आíथक स्थिती नाजूक असतानाही कोल्हापूरकरांची इच्छा लक्षात घेऊन पूर्वी घोषित केल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला असल्याकडे, त्यांनी लक्ष वेधले.
पालकमंत्री निर्णयाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना सांगत असताना शहरातील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीवेळी घोषित केलेला शब्द उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ िशदे यांनी पाळला असल्याने ते टोलमुक्तीचे मानकरी असल्याचे म्हटले आहे. संकटे अंगावर झेलूनही न डगमगता लढा देणाऱ्या शिवसनिकांचे त्यांनी कौतुक केले.
राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक यांनी जनतेच्या लढय़ाकडे लक्ष देऊन शहर टोलमुक्त केल्याबद्दल मुख्यमंत्री, सहकारमंत्री तसेच लोकप्रतिनिधी यांचे अभिनंदन केले. जनतेला एखादी गोष्ट नको असेल तर ती आंदोलनाच्या माध्यमांतून कशी दूर करता येऊ शकते याचा चांगला पायंडा टोल आंदोलनातून दिसून आला.
टोलमुक्तीने कोल्हापुरात जल्लोष
टोलमुक्तीने कोल्हापुरात जल्लोष
Written by अपर्णा देगावकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-12-2015 at 03:45 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enthusiasm in kolhapur due to toll free