दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : तयार कापडावरील नक्षीकाम केलेले काठ असो किंवा उत्पादन कंपन्यांची नावे, हे शिलाई करण्याचे काम वस्त्रोद्योगातील ‘जेकार्ड’ यंत्राद्वारे केले जाते. आजवर विदेशात तयार होणाऱ्या या यंत्रांवर येथील अभियंता आणि कल्पक उद्योजक समीर नाईक यांनी संशोधन करत संपूर्णपणे भारतीय बनावटीचे असे पहिले ‘जेकार्ड’ यंत्र तयार केले आहे. विदेशी यंत्राच्या तुलनेत याची किंमत तर कमी आहेच पण ‘आत्मनिर्भर भारता’चे हे उत्पादन जागतिक पातळीवर गुणवत्तेतही सरस आहे. यामुळे नाईक यांनी बनवलेल्या या ‘जेकार्ड’ला सध्या देशभरातून मोठी मागणी येत आहे.

rohini godbole
व्यक्तिवेध : रोहिणी गोडबोले
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
raju shetti, sugarcane farmers, jaysingpur,
उसाला ३७०० रुपये उचल द्यावी; ‘स्वाभिमानी’च्या परिषदेत मागणी
This Diwali the FDA will conduct a special drive to inspect food products
एफडीएची दिवाळीनिमित्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम
Anti farmer ideology of Modi government
लेख : शेतकरीहिताची ‘चित्रफीत’; राष्ट्रहित की मित्रहित?
Residents of Nagpur are upset because of the no right turn activity
नागपूर: ‘नो राईट टर्न’मुळे नागपूरकर हैराण
case against ravindra dhangekar hindmata pratishthan
रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानविरुद्ध गुन्हा; दिवाळीनिमित्त नागरिकांना साबण, उटणे वाटप
Loksatta lokrang Humanist and nature conscious architect Christopher Beninger passed away
निसर्गपूरक वास्तुरचनाकार

हेही वाचा >>> उसाचे थकीत १०० रूपये द्या, अन्यथा कारखान्यांची साखर अडवणार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखानदारांना इशारा

साधा यंत्रमाग असो की, अत्याधुनिक शटललेस त्यावर कापड विणण्याचे काम होते. मात्र, याच्या बरोबरीने कापडावर नक्षीकाम पण हवे असते. नामांकित कंपन्यांना त्यांच्या या कापड उत्पादनावर त्यांची नाममुद्रा (ब्रँडनेम) पण नोंदवायची असते. हे काम ज्या माध्यमातून होत असते, त्या यंत्राला तांत्रिक भाषेत ‘जेकार्ड’ असे म्हणतात. ‘जेकार्ड’च्या उत्पादनात इटलीतील कंपन्यांचा बोलबाला आहे. या देशाची मक्तेदारी आणि त्यांच्या ४० ते ४५ लाख रुपयांच्या घरात असलेल्या किंमती यामुळे इच्छा असून सामान्य यंत्रमागधारक ‘जेकार्ड’ खरेदीच्या भानगडीत पडत नाहीत. यामुळे वस्त्रोद्योगातील या कामासाठी अन्य कुणावर तरी अवलंबून राहावे लागते. या साऱ्यांचा विचार करूनच उद्योजक नाईक यांनी या ‘जेकार्ड’चा अभ्यास आणि संशोधन करत त्याची निर्मिती तर केलीच पण हे यश मिळवतानाच संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या या यंत्रासाठी उत्पादन खर्चही कमी आल्याने आता त्याची विक्री किंमतही कमी झाली आहे.

असा झाला श्रीगणेशा

समीर नाईक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर. घरचाच वस्त्रोद्योग आहे. मात्र हा व्यवसाय आणि शिक्षण घेत असतानाच त्यांची नजर ‘जेकार्ड’च्या समस्येकडे वळाली. केवळ अत्याधुनिक शटललेस नाही तर साध्या मार्गावर सुद्धा ‘जेकार्ड’ कसे बसवता येईल, यावर त्यांनी संशोधन सुरू केले. पुढे त्यांनी टेक्स्टाईल, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, कॉम्प्युटर आदी शाखांचे ज्ञान आत्मसात केल्यावर या संशोधनात मोठी झेप घेत लवकरच ‘जेकार्ड’ची संपूर्ण नवी अशी भारतीय आवृत्ती तयार केली. अभ्यास, संशोधन आणि निर्मितीच्या या प्रत्येक टप्प्यावर त्यांना यश मिळाले. या उत्पादनाचा दर्जा हा विदेशी यंत्रासारखाच असल्याचेही सिद्ध झाले.

४०० ‘जेकार्ड’ यंत्रांची विक्री

या सर्व यशानंतर मग नाईक यांनी या उत्पादनाची ‘सिल्व्हर जेकार्ड’ या नावाने व्यापारी नोंद करत आता दोन वर्षांपासून याचे उत्पादन सुरू केले आहे. ज्या विदेशी उत्पादनासाठी ४० ते ४५ लाख रुपये मोजावे लागत होते, त्याच पद्धतीचे ‘सिल्व्हर जेकार्ड’ आता केवळ ४० हजार ते १२ लाख रुपयांत मिळत आहे. दर्जा आणि किंमत या दोन्हीमधील यशाने केवळ गेल्या दोन वर्षांत नाईक यांनी बनवलेल्या तब्बल ४०० ‘जेकार्ड’ यंत्रांची भारतात विक्री झाली आहे. विदेशातूनही मागणी येऊ लागली आहे.

केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी समीर यांच्या ‘जेकार्ड’ कारखान्यास भेट दिली. यावेळी तेथील नानाविध उत्पादने पाहून त्या कमालीच्या प्रभावित झाल्या. माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांना नाईक यांनी त्यांची प्रतिमा असलेले कापड भेट दिले तेव्हा ते देखील आश्चर्याने उडालेच. हे उत्पादन इचलकरंजीत झाल्यावर आपला विश्वासच बसला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

वेगळेपण काय?

समीर यांच्या ‘जेकार्ड’वर साडी, शालू, शर्टींग, शूटिंग, बेडशीट, चादर आदींसाठीच्या कपड्यांवर नक्षीकाम होते. त्यांनी त्यांच्या या उत्पादनाला नवतंत्रज्ञाची जोड दिली आहे. मागावर साडी, कापड किती विणले आहे, अजून किती शिल्लक आहे याची माहिती याला जोडलेल्या ‘मोबाईल ॲप’मध्ये मिळत असल्याने यंत्रमागधारकांना उत्पादनाचा अचूक अंदाज कुठूनही घेता येतो. विशेष म्हणजे ही सुविधा विदेशातील ‘जेकार्ड’ मध्येही नाही. कपड्यांवर सध्या चित्रे दिसतात पण ती छपाई केलेली असतात. समीर यांच्या ‘जेकार्ड’वर उत्पादित प्रतिमा या कापड विणतेवेळी तयार होत असल्याने कलात्मक आणि व्यापारीदृष्ट्या अधिक महत्त्व असते.

समीर नाईक यांच्याकडून १२ ‘जेकार्ड’ खरेदी करून ते यंत्रमागावर लावले आहेत. उत्पादनाचा दर्जा अत्यंत सुबक आहे. असे शिलाईतून नक्षीकाम केलेल्या कापडास मोठी मागणी आहे. त्याला दरही चांगला मिळत आहे.

सुनील पाटील, यंत्रमागधारक व संचालक, माजी अध्यक्ष पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्स्पोर्ट प्रोमोशन काउंसिल ( पीडिक्सेल)