कोल्हापूर : प्रभात भ्रमंतीवेळी हृदयविकाराचा धक्का बसल्याने नामांकित उद्योजक शिरीष सप्रे (वय ६८) यांचे बुधवारी निधन झाले. कोल्हापूरच्या उद्योग, सांस्कृतिक ,सामाजिक क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व हरपले.सप्रे यांनी उद्योग क्षेत्रात मोठे नाव कमावले. यश मेटालिक्स व सप्रे ॲाटो एक्सलरीज प्रा लि. या आटाेमाेबाईल क्षेत्रातील संस्थेचे ते अध्यक्ष होते. औद्योगिक क्षेत्रासोबतच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा लक्षवेधी वावर होता. गुणीदास फौंडेशनचे ते अध्यक्ष होते.

एक अभ्यासू, करारी व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात होते. त्यांनी सर्वसामान्यासाठी मदतीचा ओघ सुरु ठेवला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त दहा सामाजिक संस्थांना प्रत्येकी ७५ हजारांची देणगी त्यांनी दिली होती. दहा हजारांहून अधिक वृक्षारोपण त्यांनी केले आहे.अमेरीकन कंपनी कॅटलफीलरने त्यांना गौरवले होते. नियमित, चोख कर भरणारे उद्योजक म्हणुन ‘जीएसटी  विभागाने त्यांचा सन्मान केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी सुश्मिता , मुलगी राजश्री सप्रे जाधव ,जावई आदित्य जाधव, बंधु पद्माकर सप्रे असा परिवार आहे.

Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक