कचरावेचक ते पर्यावरण रक्षक ठरलेल्या मुंबई येथील सुशीला साबळे यांची यंदाच्या कुसुम पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे.५१ हजार रुपये, शाल, बोधचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती बुधवारी देण्यात आली. पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे. आंतरभारती शिक्षण मंडळाच्या पल्लवी कोरगावकर, सुचिता पडळकर, तनुजा शिपूरकर, विनय पाटगावकर यांनी ही निवड केली. पुरस्कार वितरण रविवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष सरोज एन. पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यावरण जाणीव ओल्या कचर्‍याचे परिसरातच खत केले आणि विभाग पातळीवर बायोगॅस तयार केला तर मिथेन या विषारी वायूचे प्रमाण कमी होईल. वातावरणातील तापमान कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होईल हे सांगणार्‍या आणि ’परिसर भगिनी विकास संघटने’च्या साडेतीन हजार स्त्रियांचं नेतृत्व करणार्‍या, वेगवेगळ्या इमारतींमध्ये जाऊन तेथील लोकांना सुक्या ओल्या कचर्‍याच्या विभागणीचे महत्त्व पटवून देण्याचे काम साबळे करतात.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environmentalist sushila sable selected for kusum award zws
Show comments