कोल्हापूर : ऊसदर प्रश्नाचे आंदोलन थांबल्य नंतर आता दूध दर आंदोलनाला उकळी फुटत आहे. राज्य शासनाने २४ जुलै रोजी काढलेल्या दूध दर परिपत्रकाप्रमाणे सहकारी व खासगी दूध संघ दूध उत्पादकांना दर देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यांच्या निषेधार्थ आज रेठरेधरण (ता. वाळवा जि. सांगली) येथे शेतकरी बांधवांनी होळी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर राज्यामध्ये दूध आंदोलनाचा भडका उडेल, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला. राज्यभर या दूध दर परीपत्रकाची होळी करण्यात आली.

आणखी वाचा-शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मोठं यश, ‘स्वाभिमानी’च्या मागण्या मान्य, टनामागे मिळणार ‘इतके’ रूपये

दूध दराबाबत दोन दिवसापूर्वी सरकारने बोलावलेली बैठक निष्फळ ठरली होती. तेव्हा सरकारने दूध दराबाबत काढलेला आदेश मान्य करण्यास दूध कंपन्यांनी नकार दिला असल्याचे शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले होते. त्यामुळे शेतकरी संघटना संतप्त झाल्या असून त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. यावेळी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपण सर्वांची भूमिका ऐकून घेतली आहे, सर्वांनी संयम बाळगला पाहिजे असे म्हटले होते.

बैठकीनंतर आक्रमक झालेल्या दूध उत्पादक शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शासकीय आदेशाची होळी करण्याचे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आजच्या आंदोलनात डी.के. पाटील, युवा नेते अमोल पाटील, सरपंच संदीप खोत, प्रशांत पाटील, सुहास पाटील, महादेव खोत, योगेश शिंगाडे व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex minister sadabhau khot warns of agitation if the government does not increase the price of milk mrj