कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटला प्रकरणातील साक्षीदारांची तपासणी ६ मार्चपासून सुरू होणार आहे. चार साक्षीदारांची नावे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी मंगळवारी न्यायालयात दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – स्वदेशी प्रजातीचे देखणे अश्व पाहण्याची संधी, पुण्यात शनिवारपासून दोन दिवस ‘मारवाडी हॉर्स शो’

हेही वाचा – पिंपरी महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करा, महापालिका आयुक्तांचे राज्य शासनाला पत्र

कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटल्याचे कामकाज येथील न्यायालयामध्ये सुरू आहे. गेल्यावेळी साक्षीदारांची नावे न्यायालयाकडे दिली होती. आता ६ तारखेपासून साक्षीदार तपासणी सुरू होणार आहे. त्यामध्ये पानसरे यांच्या मृतदेहाचा पंचनामा केलेले मुंबईतील दोघे पंच तसेच पानसरे यांचे कपडे, अंगावरील वस्तू जप्त केलेले दोन पंच अशा चौघांची तपासणी होणार आहे. ही नावे बचाव पक्षालाही देण्यात आली आहेत. आज त्यांना साक्षी समज काढण्याबाबत न्यायालयात विनंती केली. न्यायालयाने ती मान्य केली. न्यायालयात अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. विवेक पाटील, अ‍ॅड. चेतन शिंदे, कॉम्रेड दिलीप पोवार आणि एटीएसचे अधिकारी हजर होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Examination of witnesses in govind pansare murder case from march 6 ssb