पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. शांताराम सोमा गोताड (वय ४४, रा. आसरानगर) व श्रीकांत प्रकाश केसेकर (वय ३२, रा. जवाहरनगर) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
काल रविवारी अटक केलेल्या शांताराम व श्रीकांत हे दोघे जण गरजू महिलांना हेरून त्यांना पशाचा पाऊस पाडतो अशी बतावणी करून महिलांना पशाचे आमिष दाखवत. फशी पडलेल्या महिलांची टोळीचा म्होरक्या भोंदूबाबा भीमराव िशदे याच्याशी भेट घालून देत. आतापर्यंत या जादूटोणाप्रकरणी आतापर्यंत पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पकी या टोळीचा म्होरक्या भीमराव िशदे याचा मृत्यू झाला असून सुरेश स्वामी, हणमंत राऊत, शांताराम गोताड आणि श्रीकांत केसेकर हे पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसातून वर्तविली जात आहे.

Story img Loader