कोल्हापूर : ऊस दरासाठी आक्रोश पदयात्रा झाल्यानंतर आता शेट्टी हे ऐन दिवाळीत उपोषण करणार आहेत. जयसिंगपूर येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या बाविसाव्या ऊस परिषद राजू शेट्टी यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिषदेत ते म्हणाले, गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये अधिक द्यावे यासाठी आपण २२ दिवसाची पाचशे किलोमीटरची आक्रोश पदयात्रा पूर्ण केली. पण आंदोलन आता थांबणार नाही. आजपासून नव्या आंदोलनाला सुरुवात होत आहे .दिवाळीतील अभ्यंग्यस्नान,  लक्ष्मीपूजा, पाडवा, भाऊबीज या चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी घरातून कांदा भाकरी  कारखान्यांच्या अध्यक्षांना देऊन त्यांना ऊस उत्पादकांच्या व्यथा सांगायच्या आहेत. आज पासून मी दिवाळीला घरी जाणार नाही तर परिषदेच्या या आंदोलन स्थळी १६ तारखेपर्यंत उपोषणाला बसणार आहे.  त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fasting on diwali for sugarcane price kolhapur amy
Show comments