पन्हाळा तालुक्यात शेतकामासाठी गेलेल्या बापलेकांचा रविवारी विद्युत तारेच्या धक्क्याने मृत्यू झाला. बाबासाहेब पांडुरंग पाटील (वय ४८) व राजवर्धन (वय १६) अशी त्यांची नावे आहेत. अक्षयतृतीयेच्या सणादिवशी ही घटना घडल्याने गावकरी सुन्न झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पन्हाळा तालुक्यात वारणानगर जवळ मसुदमाले गावात सकाळी शेतात वैरण आणण्यासाठी पाटील पितापुत्र गेले होते. या शेतातून ११ किलोवॅटची विद्युत वाहिनी गेली आहे. विद्युत खांबाचा ताण काढण्यासाठी स्वतंत्र दुसऱ्या तारेचा वापर करून ती शेतात रोवली आहे. या तारेला स्पर्श होवून बाबासाहेब पाटील यांना शॉक बसला. हे पाहून त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा राजवर्धन तातडीने धावला. त्यामुळे या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

बाबासाहेब यांचे दोन्ही पाय गुडग्या पर्यंत पूर्णतः जळाले होते. त्यातच ते गतप्राण झाले. राजवर्धन हाही भाजला गेल्याने त्याचेही निधन झाले. बाबासाहेब पाटील हे मुळचे उत्रे (ता. पन्हाळा) येथील रहिवासी आहेत. माले गावचे जावई असलेले पाटील हे लग्नानतंर कायमस्वरूपी येथे राहण्यास आले होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father and son from kolhapur dies after being shocked by an electric wire in a field aau